विशाल प्रकाशबापू पाटील हे एक मराठी राजकारणी आहेत. हे सांगली लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले. त्यांचे निवडणूक चिह्न लिफाफा होते. पाटील हे माजी आमदार प्रकाशबापू वसंतराव पाटील यांचे पुत्र आहेत. २०२० पासून पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकरणी आहेत. २०२४ लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून टिकीट न मिळाल्याने ते अपक्ष लढले व विजयी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विशाल पाटील
थोडक्यात पण महत्त्वाचे.