रजनी अशोकराव पाटील (५ डिसेंबर, १९५८ - ) या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत. या राज्यसभा सदस्य असून त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रभारी आहेत.
यापूर्वी त्या बीडमधून ११व्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
२००५मध्ये त्यांची केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
न्यू यॉर्कमधील यूएन मुख्यालयात महिलांच्या स्थितीवरील संयुक्त राष्ट्र आयोगाच्या ४९ व्या सत्रात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
महाविद्यालयात असताना त्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)च्या नेत्या होत्या.
त्यांनी आपली राजकीय कारकीर्द १९९२ मध्ये जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून येउन केली.
त्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाची आहेत.
रजनी अशोकराव पाटील
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.