शिवदीप लांडे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शिवदीप लांडे

शिवदीप वामनराव लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी १९ सप्टेंबर २०२४ रोजी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. त्यांनी उपमहानिरीक्षक- कोशी रेंज, बिहार म्हणून काम पाहिले होते. यापूर्वी त्यांनी तिरहुत विभाग (मुझफ्फरपूर) कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक, तसेच बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. यापूर्वी ते दहशतवाद विरोधी पथक मुंबई, येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून पाच वर्षे कार्यरत होते. पाटणा चे एसपी म्हणून त्यांचा कार्यकाळ गाजला होता होता. त्याकाळात त्यांनी अनेक वेगवगळ्या क्षेत्रातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती. तसेच महिलांना छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे देखील ते जनमानसात लोकप्रिय झाले होते. शिवदीप लांडे यांना लोकांनी प्रेमाने 'दबंग', 'सिंघम', 'द सुपरकॉप' अशी अनेक नावे दिलेली आहेत.

प्रसार माध्यमांनुसार, ते आपल्या पगारातील ६०% ते ७०% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →