श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय (लघुरूप:SSGMCE) हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न आहे. या महाविद्यालयाची ची स्थापना २३ ऑगस्ट १९८३ रोजी श्री गजानन शिक्षण संस्था, शेगाव यांनी केली. हे श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टद्वारे चालवले जाते. येथे 'यांत्रिकी', 'विद्युत आणि दूरसंचार', 'संगणक विज्ञान' आणि 'माहिती तंत्रज्ञान' या विषयात अभियांत्रिकी मध्ये पदवी आणि पदव्युत्तर (BE आणि ME) शिक्षण दिले जाते. तसेच हे व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर (एमबीए) चे व्यावसायिक शिक्षण देखील देते. २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षात एकूण सुमारे १,६०० विद्यार्थ्यांची नोंदणी होती. या महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली ची मान्यता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →