नटराजन चंद्रशेखरन (जन्म :१९६३) हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते टीसीएसच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा समूहामधील सर्वात तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नटराजन यांचा जन्म तामिळनाडू मधील नमक्कल जवळील मोहनुर मधील तमिळ कुटुंबात झाला. नटराजन हे भारतीय संगणक सोसायटीचे मानद सदस्य आहेत. चंद्रा हे हौशी छायाचित्रकार आहेत. त्यांनी शिकागो, तोक्यो, बोस्टन, न्यू यॉर्क, बर्लिन, मुंबई, प्राग येथील प्रदीर्घ धावण्याच्या मॅरॅथॉन स्पर्धा धावून पूर्ण केल्या आहेत. कम्प्युटर ॲप्लीकेशन मध्ये मास्टर्स पदवी संपादन करून १९८७ साली चंद्रा टीसीएस मध्ये रुजू झाले. २०१४ साली हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने त्यांचा मानद डॉक्टरेट देऊन सन्मान केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नटराजन चंद्रशेखरन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.