स्वतंत्र पक्ष हा चक्रवर्ती राजगोपालचारी आणि एन.जी. रंगा व इतर राजकरण्यांनी स्थापन केलेला उदारमतवादी पक्ष होता. या पक्षाचा नेहरुंच्या समाजवादी धोरणांना व लायसन्स राजला विरोध होता.
स्वतंत्र पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत ६.८% मते आणि तिसऱ्या लोकसभेत १८ जागा मिळवू शकला. बिहार, राजस्थान, गुजरात आणि ओरीसा या राज्यात तो मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला. या पक्षाने चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत ८.७% मते आणि ४४ जागा मिळवल्या. पण इ.स. १९७१ मधील निवडणूकीत ३% मते व ८ जागाच मिळवू शकला. राजाजींच्या निधनानंतर पक्ष लगेचच अस्तास गेला व शेवटी चरण सिंगांच्या भारतीय क्रांती दलात विलीन झाला.
स्वतंत्र पक्ष
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?