शिरीन इबादी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

शिरीन इबादी ह्या (फारसी: شيرين عبادى; जन्म २१ June १९४७) ईराणी वकील आहेत. त्या एक माजी न्यायाधीश आणि मानव अधिकार कार्यकर्त्या तसेच इराण मधील Defenders of Human Rights Centerच्या संस्थापक आहेत. १० ऑक्टोबर २००३, रोजी त्यांना मानाचे नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांना हे पारितोषिक त्यांच्या लोकशाही आणि मानवी हक्क, विशेषतः महिला, मुले, आणि शरणार्थींच्या हक्कांविषयीच्या लक्षणीय मुलभूत कामांसाठी देण्यात आले. त्या हे पारितोषिक मिळणाऱ्या पहिल्या ईराणी आणि प्रथम मुस्लिम महिला आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल इराणमध्ये संमिश्र प्रतिसाद उमटला. त्यांच्या उत्साही समर्थकांनी त्यांचे परत आल्यावर विमानतळावर स्वागत केले, मात्र पुराणमतवादी समाज माध्यमांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष्य केले. ईराणी अध्यक्ष मोहम्मद खातामी यांनी हे पारितोषिक राजकीय असल्याची टीका केली .

२००९ मध्ये, नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक अहवाल प्रकाशित केला त्यात असे म्हणले की इबादी यांचे नोबेल शांतता पारितोषिक ईराणी अधिकाऱ्यांनी जप्त केले आणि असे पहिल्यांदाच झाले आहे. अर्थातच इराणने हा आरोप नाकारला .

इबादी यांचे वास्तव्य तेहरान येथे होते पण जून २००९ पासून निर्वासित केल्यामुळे त्या युरोपात राहात आहेत. २००४ मध्ये त्यांचा समावेश Forbes या मासिकात "१०० जागतिक शक्तिशाली महिलांच्या " यादीत . समाविष्ट आहे. तसेच त्यांचे नाव "सर्वात प्रभावशाली १०० महिला " या यादीत देखील समाविष्ट करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →