ऑकलंड-अलामेडा काउंटी कोलिझियम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरातील युनायटेड स्टेट्समधील बहुउद्देशीय मैदान आहे. हे मैदान १९६८ पासून मेजर लीग बेसबॉलच्या ऑकलंड ऍथलेटिक्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी हे नॅशनल फुटबॉल लीगच्या ओकलंड रेडर्सचेही घरचे मैदान होते. नंतर याच नावाचा दुसरा संघ येथे १९९५-२०१९ दरम्यान खेळत असे.
या मैदानाची प्रेक्षकक्षमता ६३,१३२ आहे.
ओकलंड कोलिझियम सध्याच्या स्थितीत अगदी भिकार स्टेडियम असल्याचे समजले जाते. ट्रॉपिकाना फील्ड बरोबर हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते
येथील ओकलंड ऍथलेटिक्स संघ लास व्हेगसला जाण्याच बेतात आहे. यानंतर येथे कोणताही व्यावसायिक संघ उरणार नाही.
ओकलंड कोलिझियम
थोडक्यात पण महत्त्वाचे.