कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (३ सप्टेंबर, १९२३ - २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.आज जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र शासनाने राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे. यातील दोन कडवी महाराष्ट्र राज्यगीत म्हणून सन 2023 स्वीकारले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शाहीर साबळे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!