राजा मयेकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; - मुंबई, १५ फेब्रुवारी २०२०) हे एक मराठी अभिनेते होते. त्यांनी सुमारे ६० वर्षे अभिनयाचे काम केले. वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी दशावतारी नाटकांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. त्यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले ते कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना त्यांचा उल्लेख ते नेहमीच करत असत. मुंबईत राहायला आल्यानंतर चाळीतील एका गृहस्थांकडे शाहीर साबळे यायचे. या चाळीत देशावरच्या कुटुंबांची बिऱ्हाडे जास्त होती. त्यांची बोलण्याची ढबही देशावरचीच होती. या सगळ्यांच्या तुलनेत राजा मयेकर यांचे मराठी खूपच प्रमाण मराठी होते. ते शाहिरांना आवडायचे. कलाक्षेत्र आणि भाषा यांवर त्या दोघांचे विशेष प्रेम होते. त्यामुळं वाण्याच्या चाळीत राहायला आल्यावर शाहिरांनी कृष्णकांत दळवी, राजा मयेकर अशा सहकाऱ्यांच्या साथीने ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →