शाह आलम

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शाह आलम

शाह आलम (भासा मलेशिया: Shah Alam) ही मलेशियाच्या संघातील सलांगोर राज्याची प्रशासकीय राजधानी आहे. सलांगोरातील पतालिंग व क्लांग जिल्ह्यांमध्ये वसलेले शाह आलम मलेशियाच्या संघीय राजधानीपासून, म्हणजे क्वालालंपूरपासून २५ कि.मी. पश्चिमेस वसले आहे. सलांगोराची पूर्वीची राजधानी असलेले क्वालालंपूर इ.स. १९७४ साली संघशासित प्रदेश बनल्यावर इ.स. १९७८ साली क्वालालंपुराऐवजी शाह आलम सलांगोराच्या राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५७ साली मलेशिया स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात वसवण्यात आलेले ते पहिले नियोजित शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →