मलाक्का

या विषयावर तज्ञ बना.

मलाक्का

मलाक्का (भासा मलेशिया: Melaka; जावी लिपी: جوهر ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिण भागात वसले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मलाक्का पर्लिस व पेनांग यांच्या पाठोपाठ तिसरे छोटे राज्य आहे. मलाक्क्याच्या उत्तरेस नगरी संबिलान, तर दक्षिणेस जोहोर वसले आहे. बांदाराया मलाका येथे मलाक्क्याची राजधानी असून ७ जुलै, २००८ रोजी या शहरास युनेस्को जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला.

मलाक्का मलेशियाच्या इतिहासातील सर्वाधिक जुन्या सल्तनतींपैकी एक आहे. मात्र इ.स. १५११ साली पोर्तुगीजांनी मलाक्क्याची सल्तनत जिंकून घेतल्यावर राजेशाही संपुष्टात आली. तेव्हापासून आजतागायत सुलतानाऐवजी यांग दि-पर्तुआ नगरी, अर्थात राज्यपाल, हा शासनप्रमुख या नात्याने राज्यकारभार सांभाळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →