सलांगोर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सलांगोर

सलांगोर (देवनागरी लेखनभेद: सेलांगोर; भासा मलेशिया: Selangor; जावी लिपी: سلاڠور ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या उत्तरेस पराक, पूर्वेस पाहांग, दक्षिणेस नगरी संबिलान, तर पश्चिमेस मलाक्क्याची सामुद्रधुनी आहे. क्वालालंपूर व पुत्रजया हे दोन मलेशियन संघाचे संघशासित प्रदेश चहूबाजूंनी सलांगोराने वेढले असून, पूर्वी ते सलांगोराच्याच अधिक्षेत्रात समाविष्ट होते.

सलांगोराची प्रशासकीय राजधानी शाह आलम येथे असून शाही राजधानी क्लांग येथे आहे.

सकल वार्षिक उत्पन्नाच्या निकषानुसार सलांगोर मलेशियाच्या संघातील सर्वाधिक संपन्न राज्य असून येथील दरडोई उत्पन्नही देशात सर्वाधिक आहे. २७ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी सलांगोर राज्य शासनाने सलांगोर मलेशियाच्या संघातील पहिले विकसित राज्य बनल्याची घोषणा केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →