जोहोर (भासा मलेशिया: Johor; जावी लिपी: جوهر ; चिनी: 柔佛州 ; तमिळ: ஒஹொரெ ; सन्मान्य नाव: दारुल ताझिम (प्रतिष्ठेचा प्रदेश); ) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिणेस वसले आहे. मलेशियातील सर्वाधिक पुढारलेल्या राज्यांपैकी ते एक आहे. जोहाराची राजधानी जोहोर बारू (पूर्वीचे नाव 'तांजोंग पुत्री') येथे आहे. जोहोराच्या उत्तरेस पाहांग, वायव्येस मलाक्का व नगरी संबिलान असून दक्षिणेस सिंगापुराच्या प्रजासत्ताकापासून जोहोरास अलग करणारी जोहोराची सामुद्रधुनी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोहोर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.