शारदा सिन्हा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शारदा सिन्हा

शारदा सिन्हा (१ ऑक्टोबर १९५२ - ५ नोव्हेंबर २०२४) ही एक भारतीय लोकगीत आणि शास्त्रीय गायिका होती. मूळची बिहारची, ती प्रामुख्याने मैथिली आणि भोजपुरी भाषेत गायन करत असे. तिला बिहारची कोकिळा असे म्हणत असे. सिन्हा यांनी "विवाह गीत", "छठ गीत" यासह अनेक लोकगीते गायली आहेत. १९९१ मध्ये, तिला संगीतातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार मिळाला. २००० मध्ये, तिला संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिला भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सिन्हा यांना मरणोत्तर भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →