शांताराम लक्ष्मण नाईक (१२ एप्रिल १९४६ - ९ जून २०१८) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी आणि राज्यसभेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार होते. ते गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील काँग्रेसचे व्हिप होते.
१९८४ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून विजय मिळवला व ८ व्या लोकसभेवर निवडून आले. लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी ८ व्या लोकसभेत सर्वाधिक खाजगी सदस्य विधेयके सादर केली. गोव्याला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीचाही त्यांनी पाठपुरावा केला. नाईक यांनी २००५ ते २०१७ दोन वेळा राज्यसभेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले. ९ जून २०१८ रोजी मडगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
शांताराम नाईक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.