शांताबाई कृष्णाजी कांबळे (१ मार्च, १९२३ - २५ जानेवारी, २०२३) या मराठी लेखिका शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या दलित स्त्री लेखिका म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. त्या मराठी साहित्यिक अरुण कांबळे यांच्या आई होत. 'माज्या जल्माची चित्तरकथा' हे आत्मचरित्र लिहिणाऱ्या शांताबाई कांबळे ह्या मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र लेखिका होत्या. २५ जानेवारी २०२३ रोजी वयाच्या १०० व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर नवी मुंबईतील कोपरखैरणे इथं बौद्ध धर्माच्या पद्धतीनं शेवटचे संस्कार करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शांताबाई कांबळे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.