शहापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. वासिंद, आसनगाव रेल्वे स्थानक, तानशेत रेल्वे स्थानक, आटगाव रेल्वे स्थानक, खर्डी रेल्वे स्थानक, उंबरमाळी रेल्वे स्थानक तसेच कसारा रेल्वे स्थानक ही रेल्वे स्थानके असून ते मुंबईच्या सीएसएमटी ते कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस पासून ८५ कि. मी.आणि ९४ कि. मी. अंतरावर आहेत.
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. मुंबईची व ठाण्याची पिण्याच्या व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज पूर्णतः शहापूर तालुका भागवतो.सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.चौढा वीज प्रकल्प कार्यान्वित आहे. पाण्यासाठी, धरणासाठी प्रसिद्ध असलेला तालुका, मात्र आदिवासी भागात तहानलेला आहे.सदर माहिती अभ्यासक अनिल सुर्यकांत दाभोळकर यांनी दिली आहे.
शेरे, शेणवे, किन्हवली, गुंडे,माहुली, अघई वै. जुनी गावे आहेत.
शहापूर मध्ये अनेक कंपन्या आहेत. जुना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३ (जुने क्रमांकन) असून, नवीन समृद्धी महामार्ग शहापूर येथून गेला आहे. शहापूर हा मुंबई, नासिक, अहिल्या नगर जोडायला सोपे साधन आहे. स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. रामजीं पितळे, सिंधूजीं पितळे, हे शहापूर मधिल मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. किसानजीं भेरे ह्यांचेही मोठे योगदान होते. मधुकर अंबावणे ( शेरे), कामेरकर(वासिंद), हेही स्वातंत्र्य सैनिक होते.
शहापूर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.