पालघर जिल्हा हा कोकण विभागात महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हा उत्तरेकडील डहाणूपासून सुरू होऊन नायगाव येथे संपतो. पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २९,९५,४२८ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.
पालघरची शहरी लोकसंख्या 1,435,210 आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 48% शहरी भागात राहतात. पूर्व व ईशान्य दिशेस ठाणे व नाशिक जिल्हा असून, गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा व दादरा व नगर हवेली व उत्तरेकडील दमण व दीव केंद्र शासित प्रदेश हे जिल्हा वसलेले आहे. अरबी समुद्राची पश्चिम सीमा बनते, तर वसई-विरार, पालघर-बोईसर, डहाणू हे मुंबई महानगर प्रदेशाचे भाग आहे.
नव्याने निर्माण झालेल्या या जिल्ह्यात खालील ८ तालुके असतील -
वसई
वाडा
जव्हार
मोखाडा
पालघर
डहाणू
तलासरी
विक्रमगड
पालघर जिल्हा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.