माहुलीगड

यामागील विज्ञान आणि इतिहास.

माहुलीगड

माहुलीगड हा महाराष्ट्रच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक १९ मार्च १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला ५ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते, असे सांगितले जाते.



किल्ल्याजवळून भारंगी नदी वाहते.

ही नदी भातसई नदीची उपनदी आहे.

ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. असे सांगितले जाते की, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या २ दिवसाआधी जिजामाता माहुली किल्ल्यावर होत्या.



भौगोलिकदृष्ट्या शहापूरच्या वायव्येला असलेला हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात भोवतालच्या महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडलेला गेला होता. कल्याण सुभ्याजवळ किल्ला म्हणून शिवकाळात त्याला विशेष महत्त्व होते. तसेच नाशिक व सुरत परिसराशी सुद्धा माहुलीचा संबंध होता. माहुलीवरून जव्हारमार्गे सुरत, तर माहुलीवरून नाशिक आणि माहुलीवरून किन्हवली-मुरबाड मार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगर अश्या भौगोलिक रचनेमुळे माहुलीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते.

ठाणे, कल्याण, भिवंडी, जव्हार, नाशिक, सुरत, मुरबाड अश्या महत्त्वाच्या ठिकाणांना माहुली किल्ला जोडलेला असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले होते.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडकापासून बनलेला हा किल्ला एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली, भंडारगड आणि पळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याची रचना ३ वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिनेस भंडारगड अशा दुर्गत्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →