शतावरी

या विषयावर तज्ञ बना.

शतावरी

शतावरी (संस्कृतमध्ये नारायणी; शास्त्रीय नाव ॲस्पॅरेगस रेसिमोसस) ही एक पर्णहीन, काटेरी, बहुवार्षिक आरोहिणी वेल आहे. खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ म्हणतात. या पर्णकांड्या पानांप्रमाणे भासतात. ही ‘पाने’ बारीक असून सुरूच्या पानासारखी दिसतात. फांद्यांवर साधारणपणे १ सें.मी. लांबीचे बाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असताता. ही ‘पाने’ २ ते ६ च्या संख्येच्या गुच्छात उगवणारी २ ते ३ सें.मी. पर्यंत लांब असतात. लांब फांद्यांवर पेरावर टोकदार, वाकडे काटे असतात. शतावरी आधारास गुंडाळून घेते व वर चढते आणि अनेक फांद्या तयार होऊन लहान काटेरी झुडूप तयार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →