१५ मार्च १८७७ रोजी जगातला पहिला वहिला कसोटी सामना मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांमध्ये खेळविण्यात आला. त्याला इ.स. १९७७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली, तर १८८० मध्ये इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना आयोजित केला गेला होता. त्याला १९८० मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. या दोन घटनांची शंभरी साजरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १९७७ साली मेलबर्न येथे आणि १९८० साली लॉर्ड्स येथे शतकपूर्ती कसोटी सामना भरविला. दोन्ही कसोटी सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झाले.
जगातला पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकला होता तर योगायोगाने मेलबर्न येथील शतकपूर्ती कसोटीदेखील ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनीच जिंकली !
शतकपूर्ती कसोटी सामने
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.