इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७० - फेब्रुवारी १९७१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत सात कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका इंग्लंडने २-० अशी बरोबरीत जिंकली.
ह्या दौऱ्यामध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर नियोजित तिसरी कसोटी पावसामुळे पहिले ४ दिवस खेळवताच आली नाही. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांनी शेवटच्या दिवशी वातावरण चांगले असल्या कारणाने ४० षटकांचा सामना ५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्नमध्येच आयोजित करण्यात आला. तत्कालिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी त्या सामन्याला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा दिला. ऑस्ट्रेलियाने जगातला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. अशाप्रकारे क्रिकेटमधील एका नवीन युगाला सुरुवात झाली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७०-७१
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.