शक्ति

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शक्ति (देवनागरी: शक्ती,IAST: Śakti ; सामर्थ्य, प्रयत्न, ऊर्जा, क्षमता" ) हिंदू धर्मात विशेषतः शाक्त पंथामध्ये उल्लेख केली गेलेली, ही मूळ विश्वाची उर्जा आहे आणि संपूर्ण विश्वात प्रवाहित असणाऱ्या चैतन्य शक्तीचे ती प्रतिनिधित्त्व करते.

शक्ति ही संकल्पना किंवा मूर्ती म्हणजे स्त्रीरूपातील दैवी सर्जनात्मक शक्तीला दिलेले मूर्तरूप आहे, जिला आदिमाता म्हणूनही हिंदू धर्मामध्ये संबोधले जाते. तिच्यातूनच विश्व निर्माण झाले असल्यामुळे तिला "आदिशक्ती" किंवा "आदि पराशक्ती" म्हणूनही ओळखले जाते. या पृथ्वीतलावर शक्तीचा आविष्कार स्त्रीरूपात किंवा सृजनात्मक/ सर्जनात्मक या रूपामध्ये जरी होत असला तरी पुरुषांमध्येही ती अव्यक्त, अप्रकट रूपाने नेहेमीच असते. हिंदूंची अशी मान्यता आहे की, निर्माण आणि सर्व प्रकारच्या बदलांचे कारण ही शक्तीच आहे. शक्ती हे विश्वाचे अस्तित्त्व आणि मुक्ती असून तिचे सर्वात महत्त्वाचे रूप म्हणजे कुंडलिनी शक्ती आहे, जे मनाच्या रहस्यात्मक आध्यात्मिक शक्तीचे रूप आहे.

शाक्तपंथामध्ये शक्तीची सर्वोच्च देवता म्हणून पूजा केली जाते. शिवाची स्त्रीरूपातील ऊर्जा म्हणजे शक्ती असून तिला त्रिपुर सुंदरी किंवा पार्वती या नावांनीही ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →