शकुंतला मजुमदार (जन्म: १९६४) ह्या एक भारतीय प्राणी हक्क कार्यकर्त्या आहेत ज्यांना ठाण्यातील 'सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स'साठी केलेल्या कामासाठी २०१६ साली नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मजुमदार यांचा जन्म १९६४ मध्ये झाला. २००२ मध्ये मजुमदार आणि इतर सहा जणांनी ठाण्यात 'सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स' ची (SPCA) शाखा स्थापन केली.
२०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी मजुमदार यांनाप्राणी हक्क कार्यासाठी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यासाठी निवडण्यात आले. हा पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आला. त्या दिवशी आणखी चौदा महिला आणि सात संस्थांना सन्मानित करण्यात आले.
२०१७ मध्ये मजुमदार आणि ठाणे एसपीसीएच यांचा स्थानिक अधिकाऱ्यांशी दोन भटक्या कुत्र्यांवरून वाद झाला होता. कुत्रे आक्रमकपणे नागरिकांच्या अंगावर धावून जात होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना पकडून न्यायचे होते. मजुमदार यांनी कुत्र्यांना उचलून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची ऑफर दिली. पण जेव्हा ते बरे झाले तेव्हा त्यांना रस्त्यावर परत आणले जाणार होते. यावरून वाद सुरूच राहिला. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना अधिकार आहेत असे पूर्वीच म्हटले होते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना उचलून नेण्याचा कादेशीर अधिकार पालिकेकडे आहे की नाही याची त्यांना खात्री नव्हती. जर कुत्र्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत सोडले जाणार असेल तर मजुमदार त्यांची नसबंदी करण्याची व्यवस्था करण्यास तयार होत्या.
फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोना व्हायरस साथीच्या सुरुवातीच्या आठवड्यात, लोकांना भटक्या प्राण्यांना स्पर्श न करण्याचे प्रोत्साहन देणारे पोस्टर्स लावले गेले होते. यामागील कारण यामुळे कोरोना विषाणू पसरू शकतो असे होते. मजुमदार आणि मनेका गांधी यांनी सदरील पोस्टर्स काढून टाकण्याची मागणी लावून धरली. ही भीती निराधार असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला होता, जो यांनी प्रामुख्याने मांडला. यानंतर मजुमदार आणि एसपीसीए गटाने घोड्यांच्या कल्याणाचे आयोजन करण्याची भूमिका स्वीकारली. घोड्यांचा वापर पर्यटकांना फिरवण्यासाठी केला जात होता. पण लॉकडाऊनमुळे हे घोडे पैसे मालकाला पैसे कमवून देऊ शकत नव्हते आणि कोणत्याही उत्पन्नाशिवाय मालक त्यांना खाऊ घालू शकत नव्हते. सबब SPCA ने या प्रकल्पावर देखील काम केले.
शकुंतला मजुमदार
थोडक्यात पण महत्त्वाचे.