उत्तरा पडवार किंवा उत्तरा परवार ह्या मध्य प्रदेशातील एक भारतीय धर्मादायी कार्यकर्त्या आहेत. त्यांना २०१३ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पडवार ह्या मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. त्या "प्रयास शिक्षा समिती" संस्थेशी संलग्न आहेत. हा गट बैगा, गोंड आणि अभुझमारियां जमातींसोबत काम करत असतो. हे आदिवासी लोक गरिबी, कुपोषण आणि आजारांनी ग्रस्त असून पडवार आणि त्यांची संस्था आदिवासी समाजाच्या याच अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतात. पडवार यांनी मुलांना एकत्र करून शिकवायला सुरुवात केली. कालांतराने त्यांचा हा छोटासा वर्ग "राणी दुर्गावती स्कूल" या नावाने शाळेत परावर्तित झाला. सर्वसामान्य आदिवासी लोक वाळलेल्या गवतापासून गादी बनवतात. रात्री झोपताना त्याच्या बाजूला आग लावून ठेवलेली असते. अनवधानाने ही गवताची गादी आग पकडते आणि गादीवर झोपलेली व्यक्ती जळून मरते. या आदिवासी लोकांची दुसरी मोठी समस्या म्हणजे हिवाळा होय. हिवाळ्यात गरीब आदिवासी लोकांना उबदार कपडे आणि खाणे या दोन्ही गरजांवर पैसे खर्च करणे परवडत नाही. त्यांना या दोन्ही पैकी एक निवडावे लागते आणि उत्तर भारतात तर जीवघेणी थंडी पडते. पडवार आणि त्यांची धर्मादाय संस्था गरजू लोकांना "गुंज विंटर किट्स" (गुंज हिवाळी संच) पुरवतात. या संचात उबदार वस्त्र, लोकरीचे कपडे आणि ब्लँकेट असतात. यामुळे गरीब आदिवासी लोकांची गरज तर भागतेच शिवाय त्यांचा यावर खर्च होणारा पैसा देखील वाचतो.
यावर प्रतिक्रिया देताना, एक गरजू, चरण परते म्हणतो, "दरवर्षी आम्हाला माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी कपड्यांवर २०००-३००० रुपये खर्च करावे लागत होते आणि आमची आर्थिक परिस्थिती पाहता, आम्ही ते जास्त व्याजदराने कर्ज घ्यायचो पण गेल्या अनेक वर्षांपासून मला कपड्यांवर काहीही खर्च केल्याचे आठवत नाही. आता आमच्याकडे पुरेसे आहे.” उत्तरा पडवार सांगतात,"गुंजशी भागीदारी केल्यापासून थंडीमुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा पूरग्रस्त राज्यांमधील लोकांसाठी हिवाळा ही दुसरी आपत्ती ठरली तेव्हा उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने हिवाळी किट पोहोचवण्यात आले."
२०१६ साली, आंतरराष्ट्रीय महिला दिनी नारी शक्ती पुरस्कार /स्त्री शक्ती पुरस्कारासाठी पडवार यांची निवड करण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी आणखी चौदा महिला आणि सात संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या गरजेबद्दल भाषणे दिली. पालकांनी जर स्त्री भ्रूण असेल तर गर्भपात करू नये. अशाने मुलींची संख्या कमी तर मुलांच्या संख्येत वाढ होईल आणि यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, असे मुखर्जी यांनी म्हटले
पडवार यांच्या कामाचे सामाज माध्यमाद्वारे मोठे कौतुक झाले. आणि तिला इतर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
उत्तरा पडवार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.