शंभर वर्षांचे युद्ध हा शब्दप्रयोग इ.स. १३३७ ते १४५३ दरम्यान चाललेल्या अनेक लढायांचा एकत्रित उल्लेख करण्याकरिता वापरल जातो. हे युद्ध व्हालवाचे घराणे व प्लांटाजेनेटचे घराणे ह्यांदरम्यान फ्रान्सची सत्ता मिळवण्यासाठी लढले गेले. व्हालोईच्या घराण्याने फ्रान्सच्या गादीवर हक्क सांगितला होता तर इंग्लंडमधील प्लांटाजेनेटच्या घराण्याने इंग्लंड व फ्रान्स ही दोन्ही राज्ये आपली आहेत अशी भूमिका घेतली होती.
११६ वर्षे चाललेल्या ह्या युद्धाची परिणती प्लांटाजेनेटच्या फ्रान्समधील हकालपट्टीत झाली. ह्या युद्धाने युरोपचा इतिहास मोठ्या प्रमाणावर पालटला. फ्रान्समधील ५० टक्के जनता १०० वर्षीय युद्धात मृत्यूमुखी पडली.
शंभर वर्षांचे युद्ध
थोडक्यात पण महत्त्वाचे.