व्हियेतनाम युद्ध (व्हियेतनामी: Chiến tranh Việt Nam) हे शीत युद्धकालातील व्हियेतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये लढले गेलेले युद्ध होते. ह्या युद्धाचा कालावधी साधारणतः नोव्हेंबर १, इ.स. १९५५ ते एप्रिल ३०, इ.स. १९७५पर्यंत मानण्यात येतो.
हे युद्ध उत्तर व्हियेतनाम व त्याचे कम्युनिस्ट सहकारी विरुद्ध दक्षिण व्हियेतनाम, अमेरिका व त्यांचे कम्युनिस्ट-विरोधी सहकारी असे लढले गेले. आग्नेय आशियामधील वाढत्या कम्युनिस्ट शक्तीला रोखणे हा अमेरिकेचा ह्या युद्धात पडण्याचा हेतू होता. व्हियेत काँग ह्या दक्षिण व्हियेतनाममधील परंतु उत्तर व्हियेतनामच्या बाजूने लढणाऱ्या पक्षाने कम्युनिस्टविरोधी सेनेविरुद्ध शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर केला. जवळजवळ २० वर्षे चाललेल्या ह्या युद्धात अखेरीस अमेरिकेला माघार घ्यावी लागली व ५८,२२० सैनिक गमावल्यानंतर १५ ऑगस्ट १९७३ रोजी अमेरिकेने आपले सर्व सैन्य ह्या युद्धामधून काढून घेतले. एप्रिल १९७५ मध्ये दक्षिण व्हियेतनामची राजधानी सैगॉनवर उत्तर व्हियेतनामने कब्जा मिळवला व ह्या युद्धाचा अंत झाला. युद्धाची परिणती म्हणून दक्षिण व उत्तर व्हियेतनामचे एकत्रीकरण झाले व व्हियेतनामचे साम्यवादी गणराज्य ह्या देशाची निर्मिती झाली. तसेच आग्नेय आशियामधील कंबोडियामध्ये पोल पोटच्या नेतृत्वाखाली ख्मेर रूज ह्या कम्युनिस्ट पक्षाने सरकार स्थापन केले. लाओसमध्ये देखील कम्युनिस्ट राजवट सत्तेवर आली.
व्हियेतनाम युद्ध
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.