व्ही.के. विस्मया

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

व्ही. के. विस्मया (वेलुवा कोरोथ विस्मया) (जन्म: १४ मे १९९७) ही एक भारतीय धावपटू आहे, ती ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रवीण आहे. २०१८ च्या आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिलांच्या ४×४०० मीटर रिले संघाचा ती भाग होती. २०१९ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने ४×४०० मीटर रिलेमध्ये महिला गटात तसेच मिश्र गटात रौप्यपदके जिंकली.

व्ही. के. विस्मया ही दोहा येथील २०१९मधील वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मिश्र रिले संघाची सदस्या होती. हा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आणि आता त्याने २०२१ च्या तोक्यो ऑलिम्पिकसाठीही आपले स्थान पक्के केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →