हिमा दास

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हिमा दास

हिमा दास (जन्म :९ जानेवारी, २०००) ही एक भारतीय धावपटू आहे. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड जुनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे.

हिमा दासचे टोपणनाव धिंग एक्सप्रेस आहे. तिने जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८ आशियाई खेळांमध्ये ५०.७९ सेकंदांच्या वेळेसह ४०० मीटर्समध्ये सध्याचा भारतीय राष्ट्रीय विक्रम केला आहे. IAAF वर्ल्ड U२० चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ऍथलीट आहे. राज्याच्या एकात्मिक क्रीडा धोरणांतर्गत तिची आसाम पोलिसांमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →