व्लादिमिर व्हीसिल्येविच फेडोसेव्ह (जन्म: १६ फेब्रुवारी १९९५) हा स्लोव्हेनियाकडून खेळणारा एक रशियाई बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. तो रॅपिड बुद्धिबळ आणि बुद्धिबळ-९६० मध्ये युरोपीय विजेता आहे. त्याने २०१५, २०१७, २०२१, २०२३ आणि २०२५ मध्ये बुद्धिबळ विश्वचषकात भाग घेतला.
फेडोसेव्ह खांटी-मानसिस्क येथे झालेल्या जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या रशिया संघाचा भाग होता. डिसेंबर २०१७ मध्ये रियाध येथे झालेल्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंदकडून प्लेऑफ गमावल्यानंतर त्याने रौप्य पदक जिंकले.
डिसेंबर २०२३ मध्ये, फेडोसेव्हने उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याने रॅपिड विभागात ९.५/१३ गुण मिळवून रौप्य पदक जिंकले, जेथे तो फक्त सर्वोच्च मानांकित मॅग्नस कार्लसनच्या मागे राहिला.
सप्टेंबर २०२४ मध्ये, फेडोसेव्हने ४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये जगातील क्र. १ मॅग्नस कार्लसनचा पराभव केला व स्लोव्हेनिया संघाला एकून ९व्या स्थानावर पोहोचवले. डिसेंबर २०२४ मध्ये, त्याने युरोपीय रॅपिड आणि बुद्धिबळ ९६० अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्या.
व्लादिमिर फेडोसेव्ह
या विषयावर तज्ञ बना.