नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह

नोदिरबेक अब्दुसत्तोरोव (जन्म १८ सप्टेंबर २००४) हा एक उझबेकी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. एक बुद्धिबळातील प्रतिभावान खेळाडू म्हणून, तो १३ वर्षे, १ महिना आणि ११ दिवसांच्या वयात ग्रँडमास्टर पदवीसाठी पात्र ठरला. एप्रिल २०१८ मध्ये फिडे ने त्याला ही पदवी बहाल केली. तो उझबेकिस्तानचा सर्वोत्तम ग्रँडमास्टर आहे आणि सध्या जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंपैकी एक आहे.

अब्दुस्तोरोव्हने जागतिक रॅपिड अजिंक्यपद स्पर्धा २०२१ जिंकली व तो १७ वर्षे आणि ३ महिन्यांत सर्वात तरुण रॅपिड विश्वविजेता आणि कोणत्याही वेळेच्या स्वरूपात सर्वात तरुण ओपन बुद्धिबळ विश्वविजेता बनला व त्याने २००९ मध्ये जागतिक ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेल्या १८ वर्षांचा मॅग्नस कार्लसनचा विक्रम मोडला. या स्पर्धेत अब्दुस्तोरोव्हने टायब्रेकर सामन्यात इयान नेपोम्नियाच्चीचा पराभव करून २०२१ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. २०२२ मध्ये, अब्दुस्तोरोव्हने ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये उझबेकिस्तानसाठी पट १ वर खेळला, जिथे त्याच्या संघाने सुवर्णपदक जिंकले आणि त्याने त्याच्या पट-१ च्या कामगिरीसाठी वैयक्तिक रौप्य पदक जिंकले. २४०० पेक्षा जास्त गुणांकन मिळवणारा सर्वात तरुण खेळाडूचा विक्रमही अब्दुस्तोरोव्हच्या नावावर आहे. एप्रिल २०२४ मध्ये, तो जागतिक क्र. ४ वर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →