व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन (रशियन: Владимир Владимирович Путин) (७ ऑक्टोबर, इ.स. १९५२ - हयात) हे संयुक्त रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व सध्या रशियाचे पंतप्रधान, तसेच संयुक्त रशिया व रशिया आणि बेलारुस संघाच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष आहेत. ३१ डिसेंबर, इ.स. १९९९ रोजी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन याच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुतिन राष्ट्राध्यक्ष बनले. इ.स. २००० सालातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकींत पुतिन विजयी झाले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर ते ७ मे, इ.स. २००८ पर्यंत पदारूढ होते.
रशियन राज्यघटनेच्या अनिवार्य अटींमुळे पुतिन सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊ शकले नाहीत. इ.स. २००८ च्या निवडणुकीमध्ये जिंकलेला त्याचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव, याने पुतिन यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. पुतिन यांनी ८ मे, इ.स. २००८ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. सप्टेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांनी इ.स. २०१२ सालातील अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तिसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा इरादा स्पष्ट केला.
देशात राजनैतिक स्थैर्य आणणे आणि कायदा सुव्यवस्था पुनःप्रस्थापित करण्याचे श्रेय पुतिन यांना दिले जाते. दुसऱ्या चेचेन युद्धानंतर पुतिन यांनी राष्ट्रीय एकात्मता पुनःस्थापित केली. पुतिन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत रशियन अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून वर आली. सलग ९ वर्षे रशियन अर्थव्यवस्थेत वृद्धी होत आहे. देशाचे सकल आर्थिक उत्पन्न ७२% वाढले आहे आणि गरिबी ५०%नी घटली. देशातील जनतेचे सरासरी मासिक उत्पन्न ८० अमेरिकी डॉलरांहून वाढून ६४० अमेरिकी डॉलर झाले आहे.
व्लादिमिर पुतिन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!