व्यापार चक्र

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

व्यापार चक्र हा अर्थव्यवस्थेतील चढउतारीचा एक परिणाम आहे. काही वेळा किमतीत वाढ होत असताना उत्पादनातही वाढ होत असते. कामगारांची मागणी वाढत असते, आर्थिक उत्पादन वाढत असते व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. यालाच तेजीची अवस्था असे म्हणतात. याउलट वस्तुच्या किमती कमी होतात, उत्पादन घटते, नफा घटतो व उत्पादन घटल्यामुळे कामगारांची बेकारी निर्माण होते या परिस्थितीला मंदी असे म्हणतात, अर्थव्यवस्थेत तेजी नंतर मंदी आणि मंदीनंतर तेजी असा क्रम चालु राहतो. यालाच तेजी मंदी चक्र किंवा व्यापार चक्र असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →