बेकारी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बेकार म्हणजे ज्याला काम मिळालेले नाही असा व्यक्ती होय, बेकारीचा अभ्यास करताना दोन बाबी आधी स्पष्ट झाल्या पाहिजेत, पहिली म्हणजे बेकारीची व्याख्या कार्यकारी लोकसंख्येपर्यंतच मर्यादीत ठेवावी लागते, लोकसंख्येतील ० ते १४ वयोगट व ज्येष्ठ नागरिक इ. घटक वजा केल्यावर जी उरते ती कार्यकारी लोकसंख्या होय.

बेकारी म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्मांण होतो.

भारतात १९८० ते १९९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकारी होती. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला आहे. तरीही बेकारीची समस्या वाढते आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →