सांगली

या विषयावर तज्ञ बना.

सांगली

सांगली उच्चार हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे व प्रमुख शहर आहे.

सांगली शहर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान हरिपूर या शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी. वर आहे. सांगली येथे इ.स १८७६ ते ८ फेब्रुवारी १९९८ पर्यंत नगरपालिका होती. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली (मिरज-कुपवाड) शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.

इ.स २०११ च्या जनगणनेनुसार या महापालिकेची एकूण लोकसंख्या ५,०२,७९३ असून त्यामध्ये २,४९,१५३ पुरूष व २,५३,६४० स्त्रिया होत्या. सांगली शहराची २०२३ ची लोकसंख्या ८,०४,५९६ असून शहर झपाटिने वाढत आहे.

सांगली शहराचे एकूण क्षेत्रफळ ११८ चौ.किमी. असून प्रभागांची संख्या

२० आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालय सांगली शहर येथे असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे जिल्हास्तरावरील केंद्र व राज्यस्तरावरील शासकीय, निमशासकीय व महामंडळांची कार्यालये येथे आहेत. वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने सांगलीला प्रामुख्याने कृषी उत्पादनांचा व्यापार खूप मोठा आहे. हळदीची आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ सांगली येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’(yellow city)असे संबोधले जाते. शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्याही सांगली शहर प्रसिद्घ आहे. कला वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशिल्प, औषधनिर्माणशास्त्र, आयुर्वेदिक, शासकीय वैद्यकिय,वैद्यक, दंतविज्ञान, पर्यावरण विज्ञान इ. शाखांची महाविद्यालये सांगलीत आहेत.

मराठी नाटकाचे हे उगमस्थान असल्याने सांगलीला ‘नाट्यपंढरी’ असे संबोधले जाते. सांगलीचे अधिपती सर चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी राजाश्रय दिल्यामुळेच विष्णुदास भावे यांनी इ.स १८४३ साली लिहिलेल्या सीता स्वयंवर या नाटकाचा प्रथम प्रयोग सांगली येथे झाला. म सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर हे पहिलवानांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने तसेच बिजली या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाणारे माजी आमदार कै. संभाजी पवार हेही याच मातीतले. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →