बखर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बखर

बखर शब्दाची उत्पती अरबी शब्द खबर (बातमी, वृत्तांत) पासून झालेली आहे. मराठांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रुढ झाला आहे. अशी माहिती अर्थातच ऐतिहासिक व्यक्ति व घटनांच्याविषयी असते. अनेक वेळा चरित्रकांना हुकूमावरून बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे. तथापि बखरकार एका विशिष्ट पक्षाचे असल्याने त्यांचा इतिहास पक्षपतीपणे लिहिला जात असे. स्वयकीयांची स्तुती व परकीयांची निंदा असे. तरीही राजकीय स्वरुपाच्या इतिहास लेखनाची परंपराच्या दृष्टीने त्यांचे महत्व आहे. शालीवाहन बखर ही सर्वांत जुनी बखर आहे. वि. का. राजवाडे यांच्या मते इ.स १८१८ पर्यंत सुमारे अडीचशे बखरी लिहिल्या गेल्या. इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ७० बखरी प्रसिद्ध झाल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →