शिंतो धर्म

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शिंतो धर्म

शिंतो किंवा शिंटो (जपानी: 神道) हा जपान मधील सर्वात मोठा धर्म आहे. या धर्मास जपानी लोकांचा स्थानिक व आध्यात्मिक धर्म मानले जाते. अनेक अहवालांनुसार, जपानमधील सुमारे ७०% ते ९६% लोक शिंतो धर्माला मानणारी आहे. जपानमध्ये सुमारे ८०,००० शिंतो विहारे (स्तूप) अस्तित्त्वात आहेत. जपानी लोक शिंतो धर्माचे आणि बौद्ध धर्माचे एकत्रितपणे पालन करतात.

जपानमध्ये चीनमधून आलेले तीन धर्म प्रचलित आहेत : कन्फ्यूशियन, ताओ आणि बौद्ध धर्म, त्यापैकी बौद्ध धर्म हा सर्वात प्रभावशाली आहे. जपानमधील मूळ स्थानिक लोक आयन आहेत, आणि शिंटो हा प्रामुख्याने येथील स्थानिक धर्म आहे. इतर दोन वंश आशियाई प्रदेशातील आहेत. या वांशिक तंतूंनी जपानची संस्कृती, भाषा आणि पौराणिक कथांवर आपली छाप सोडली आहे. या परदेशी घटकांनी शिंटो धर्माच्या द्वैतवादालाही अंतिम स्वरूप दिले. शिंटोवादच्या संपूर्ण इतिहासात हा द्वैतवाद दिसून येतो. हा द्वैतवाद औपचारिक, अधिकृत आणि राष्ट्रीय संप्रदाय, लोकप्रिय प्रथा आणि सामान्य दैनंदिन जीवनामध्ये आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →