पोवाडा हा अस्सल मराठी वाङ्मयप्रकार असून तो तेराव्या शतकात उदयाला आला आणि सतराव्या शतकापर्यंत जोमात राहिला. 'पोवाडा' हा दृश्य, श्राव्य प्रकार आहे. पोवाड्याचा उल्लेख 'कीर्ती' काव्यात केला जातो. पोवाडा म्हणजे "वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या मते बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा", तरी सुद्धा पोवाडा म्हणजे ठासून स्तुती करणे किंवा वीरांच्या पराक्रमाचे स्तुतीपर गेय कवन असे म्हणत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोवाडा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.