मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील प्रबोधनासाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने मार्च २२, १९७० रोजी पुण्यात स्थापन झाली. मंडळाच्या जाहीरनाम्यात भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील प्रबोधनाची दरी भरून काढून खऱ्या अर्थी ह्या दोन्ही समाजांचे संबंध सुधारणे, राष्टीय एकात्मता निर्माण होणे आणि भारतीय प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय सदस्य नांदणे, स्त्री-पुरुष-समानता निर्माण होणे ह्या निकडींतून मंडळाची स्थापना करण्यात येत असल्याचे म्हणले आहे. .मुस्लिम सत्यशोधक मंडळ आपल्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक सलोखा आणि महिला सबलीकरणासाठी काम केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करते. २०१९चा पुरस्कार हा प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉ झीनत शौकत अली आणि लोकप्रिय लेखक-कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांना प्रदान करण्यात आला.बशीर मोमीन कवठेकर यांनी आपल्या साहित्यातून हुंडाबंदी, स्त्रीभूण हत्या, निरक्षरता यासारखे ज्वलंत सामाजिक विषय हाताळले असून सामाजिक परिवर्तनासाठी ग्रामीण महाराष्ट्रात पथनाट्याद्वारे जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुस्लिम सत्यशोधक मंडळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.