बशीर मोमीन कवठेकर (१ मार्च, १९४७ - १२ नोव्हेंबर, २०२१) एक भारतीय साहित्यिक आहेत ज्यांनी मराठी भाषेत लावण्या, वगनाट्ये, ऐतिहासिक नाटके, धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली आहेत.. हुंडाबंदी, दारूबंदी, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी लेखन करीत त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले. व्यसनमुक्ती, राष्ट्रीय साक्षरता अभियान, ग्राम स्वछता अभियान यासारख्या शासकीय चळवळी मध्ये सुद्धा त्यांनी हिरहिरीने भाग घेतला आणि आपल्या कलापथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले.. लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे .
महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी त्यांनी वगनाट्ये, लावण्या, लोकगीते, सवाल-जवाब, गण-गवळण आणि फार्स असे विविधांगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तमाशा मंडळांना पुरवले. त्यांनी रंगमूभिवर नाटक, तमाशात वगनाट्य आणि जनजागृतीसाठी पथनाट्यात सुद्धा अभिनय केला आहे. गेल्या दोन दशकांपासून ते तरुण कलावंतांना मार्गदर्शन करीत आहेत. असंगठित कलावंतांना संगठीत करून त्यांच्यासाठी आरोग्य मेळावा, गरीब कलावंतांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, वृद्ध कलाकारांना मानधन अशा विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. मराठी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते परंतु त्यांनी आपल्या साहित्यात ग्रामीण बोली भाषेचा प्रामुख्याने वापर केला आणि त्यांच्या याच शैलीमुळे त्यांचे साहित्य जण- सामान्यांत सहज लोकप्रिय झाले.
बशीर मोमीन कवठेकर
या विषयातील रहस्ये उलगडा.