१७ व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ,जागरण,बळीराजा आणि महासुभा,ज्योतिबा यांच्या कार्याची जागृती पर गीत गायन जागरण, वाघ्यामुरळी, दशावतार, बहुरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इ. लोककलाप्रकार प्रचलित होते. या सर्व नाटयात्मक लोककलाप्रकारात आणि तमाशामध्ये तांत्रिक अंगाच्या दृष्टीने आणि वाड्.मयीन बाजूने काहीएक प्रमाणात साधर्म्य आढळते. तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तमाशा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.