व्याघ्रप्रकल्प अथवा प्रोजेक्ट टायगर या नावाने प्रसिद्ध असलेले प्रकल्प भारत सरकारतर्फे चालवण्यात येतात. यात मुख्यत्वे भारतीय वाघांचे संरक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. वाघांच्या संरक्षणाअतंर्गत त्यांच्या वसतीस्थानाचे संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करणे गृहीत आहे.
वन्य वाघांची कमी होणारी संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. भारतात सध्या डिसेंबर 2023 पर्यंत 3682 वाघ आहेत असा अंदाज आहे. देशातील सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात असून त्यांची संख्या 785 आहे.
महाराष्ट्रात 444 वाघ आहेत.
देशात मार्च 2025 पर्यंत 58 व्याघ्र प्रकल्प आहेत.
विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा 54 वा आहे.
29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिवस म्हणुन साजरा केला जातो.
व्याघ्रप्रकल्प
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.