वाघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वाघ

'वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वोच्च स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील 'व्याघ्र' या शब्दावरून आली आहे. इंग्रजीत वाघाला 'टायगर असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला 'ढाण्या' वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे.

इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.

एके काळी पश्चिमेस पूर्व अँटोलिया प्रदेश पासून अमूर नदी पात्रात आणि दक्षिणेस हिमालयाच्या पायथ्यापासून सुली बेटांपर्यंतच्या बालीपर्यंत सर्वत्र वाघ पसरले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस, वाघाची संख्या पूर्वीहून ९३% ने कमी झाली आहे तसेच पश्चिम आणि मध्य आशियात, जावा आणि बाली बेटांमधून आणि आग्नेय, दक्षिण आशिया आणि चीनच्या मोठ्या भागांतून लोप पावली आहे. सध्याची वाघ प्रजाती भारतीय उपखंड आणि सुमात्रावरील सायबेरियन समशीतोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. १९८६ पासून वाघाला आययूसीएन रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे. २०१५ पर्यंत जगातील प्रौढ वाघांची संख्या ३०६२ ते ३९४८ असावी असा अंदाज आहे. भारतात सध्या सर्वात अधिक वाघांची संख्या आहे. वाघांची संख्या कमी होण्याच्या मुख्य कारणांमध्ये त्यांचे प्राकृतिक आवास स्थान नष्ट करणे, खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे. काही देशांमधील अधिक दाट लोकवस्ती चे अतिक्रमण या ठिकाणी कारणीभूत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →