वॉशिंग्टन मेट्रो ही भुयारी रेल्वे वॉशिंग्टन, डी.सी. शहर आणि उपनगरांना जोडणारी रेल्वेसेवा आहे. याला मेट्रो किंवा मेट्रोरेल नावांनीही ओळखले जाते.
वॉशिंग्टन मेट्रो अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची (न्यू यॉर्कनंतर) सर्वाधिक वर्दळीची भुयारी रेल्वेसेवा आहे. २००८ साली यातून २१ कोटी ५३ लाख प्रवाशांनी याचा वापर केला. ही सेवा वापरण्याचे मूल्य अंतर, वेळ तसेच तिकिटाच्या प्रकारावरून ठरते.
मेट्रो वॉशिंग्टन, डी.सी. आणि मेरीलँड व व्हर्जिनिया राज्यांना आपली सेवा पुरवते. मेरीलँडमध्ये मेट्रो माँटगोमरी आणि प्रिन्स जॉर्जेस जिल्ह्यांमध्ये सेवा देते; तर व्हर्जिनियामध्ये ती अर्लिंग्टन, फेरफॅक्स आणि लाउडन काउंट्या आणि अलेक्झांड्रिया या स्वतंत्र शहराला सेवा पुरवते. १९ मे २०२३ रोजी पोटोमॅक यार्ड येथे नवीन स्टेशन उघडणे, हा या प्रणालीचा सर्वात अलीकडील विस्तार आहे. डी.सी. महानगर क्षेत्राच्या दाट लोकवस्तीच्या भागात ही प्रणाली मुख्यत्वे जमिनीखालून धावते, तर उपनगरीय भागातील बहुतेक मार्ग पृष्ठभागावर किंवा पुलांवरून धावते. व्हीटन स्थानकातील ७० मीटर (२३० फूट) लांबीचा सरकता जिना पश्चिम गोलार्धातील सर्वाधिक लांबीचा आहे.
२०२५ मध्ये एकूण १८,८५,४९,७०० प्रवाशांनी या प्रणालीवर प्रवास केला होती. ही संख्या प्रत्येक कामाच्या दिवशी सुमारे ४,३९,२०० इतकी होती. प्रवासी संख्येनुसार अमेरिकेतील जलद प्रवासी प्रणालीपैकी मेट्रो न्यू यॉर्क सिटी सबवेनंतर ही दुसरी सर्वात व्यस्त आणि उत्तर अमेरिकेतील पाचवी सर्वात व्यस्त रेल्वे आहे. जून २००८ मध्ये मेट्रोतून सर्वाधिक १,९७,२९,६४१ फेऱ्या (प्रत्येक कामाच्या दिवशी सरासरी ७,९८,४५६) झाल्या.
वॉशिंग्टन मेट्रो
यामागील विज्ञान आणि इतिहास.