आंतरराष्ट्रीय टी२० हा दोन प्रतिनिधी संघांदरम्यान खेळला जाणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. आंतरराष्ट्रीय टी२० सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या नियमांनुसार खेळला जातो. एप्रिल २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १ जुलै २०१८ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या महिला ट्वेंटी-२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. वेस्ट इंडीज महिला संघाने डब्लिन येथे आयर्लंडचा ७५ धावांनी पराभव करून टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जून २०२४ पर्यंत वेस्ट इंडीजकडून ५१ महिला क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. सहा खेळाडूंनी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ हा वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करणारा बहुराष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. त्यामध्ये अँटिगा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डॉमिनिका, ग्रेनेडा, गयाना, जमैका, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट किट्स आणि नेव्हिसचा काही भाग, माँटसेराट, ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूह, सिंट मार्टेन आणि युनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह यांचा समावेश होतो.
या यादीत किमान एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेल्या वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांचा समावेश आहे.
वेस्ट इंडीजच्या महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.