वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२

वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२२ दरम्यान चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. मूलत: दौऱ्यात एकूण पाच महिला वनडे आणि तीन महिला ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश होता. परंतु नंतर तीन ट्वेंटी२० आणि एक महिला वनडे सामने वेळापत्रकातून काढले गेले.

मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हान नीकर्कला दुखापत झाल्याने ती या मालिकेतून आणि २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडली. उपकर्णधार लिझेल ली हिला कोव्हिड-१९ची लागण झाल्याने तीने देखील मालिकेत भाग घेतला नाही. त्यामुळे सुने लूसला कर्णधारपदाची सुत्रे देण्यात आली. सर्व महिला वनडे सामने जोहान्सबर्ग मधील वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळविण्यात आले. पहिला सामना पावसामुळे अर्धातून रद्द करावा लागला. दुसऱ्या सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हर मध्ये वेस्ट इंडीजने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. अखेरचे दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →