भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०२२

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०२२

भारत क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२२ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खेळविण्यात आले.

भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. भारताने वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच व्हाइटवॉश दिला. ट्वेंटी२० मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडीजने पुनरागमन केले. त्रिनिदादहून भारतीय खेळाडूंचे सामान बासेतेरला पोचण्यास उशीर झाल्याने दुसरा ट्वेंटी२० सामना तब्बल तीन तासांच्या विलंबाने सुरू झाला. भारताने शेवटचे तीन्ही सामने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिकेमध्ये ४-१ अश्या फरकाने विजय नोंदवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →