विश्वजीत कदम (१३ जानेवारी, १९८०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा या विभागांचे राज्य मंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब हे स्व.माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांचे सुपुत्र. पतंगरावजी कदमांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याकडे त्यांचा कल असतो.
ते भारती विद्यापीठाचे कार्यवाहक म्हणून काम पाहतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 162000+ मतांनी निवडून येण्याची विक्रम त्यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी च्या काळात अडीच वर्ष राज्यमंत्री पद भुषवले आहे. २०१९ च्या महापुरातील त्यांचे काम उलेखनीय आहे. तसेच डिसे.२०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा धुव्वा उठवून आपला गड अबाधित ठेवला.
विश्वजीत कदम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.