विल्सन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्याच्या एल्सवर्थ काउंटी मधील छोटे शहर आहे. येथे स्थायिक झालेल्या मूळ चेक लोकांमुळे या शहराला कॅन्ससची चेक राजधानी म्हणतात. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ८५९ होती.
बटरफील्ड ओव्हरलँड डिस्पॅच या टपाल आणि मालवाहतूक कंपनीने १८६५मध्ये सध्याच्या विल्सनच्या दक्षिणेस दीड मैलांवर स्टेजकोच स्थानक बांधले. तीन वर्षांनंतर कॅन्सस पॅसिफिक रेल्वेने विल्सनच्या ठिकाणी विल्सन रेल्वे स्थानक बांधले. १८७१मध्ये, द नॅशनल लँड कंपनीने गुरांचा व्यापार सुरू करण्याच्या आशेने येथे शहराचे सर्वेक्षण करून त्याला बॉसलँड असे नाव दिले. या शहरामध्ये गुरांच्या व्यापाराचा जम बसला नाही व कालांतराने ते विल्सन या नावाने ओळखले जाऊ लागले.
१८७४ च्या सुरुवातीस बोहेमियामधून स्थलांतरित झालेले चेक लोक येथे रेल्वेमार्गावर काम करण्यासाठी आले आणि त्यांनी येथे वस्ती केली तसेच आपली संस्कृतीही येथे आणली.
१८८३मध्ये विल्सनची औपचारिकपणे स्थापना झाली.
१० जुलै, १८६७ रोजी कॅन्ससचे गव्हर्नर रॉबर्ट डॉकिंग कॅन्सासची चेक राजधानी म्हणून घोषित केले. २०१२ च्या सुमारास शहरातील १४.४% लोकांचे पूर्वज चेक होते. येथील चेक लोकांनी गावात जगातील सर्वात मोठे चेक अंडे तयार केलेले आहे.
विल्सनमध्ये १९०१ साली एक ऑपेरा हाऊस बांधण्यात आले. २००९मध्ये लागलेल्या भीषण आगीत हे नष्ट झाले परंतु २०२३पासून त्याचे नूतनीकरण सुरू आहे.
विल्सन (कॅन्सस)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.